रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 13 नोव्हेंबर 2022 (15:04 IST)

विषारी मुंग्या चावल्याने 3 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

डेहराडून : उत्तराखंडच्या डेहराडून मधील बागेश्वरमधील कपकोट येथे दोन मुलांना विषारी मुंग्यांनी चावल्याने त्यातील एका तीन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. ही घटना पौसारी गावात गुरुवारी घडली आहे. सागर असे या मयत चिमुकल्याचे नाव आहे. 

पौसरी गावात गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भूपेश राम यांचा पाच वर्षांचा मुलगा प्रियांशू आणि तीन वर्षांचा मुलगा सागर अंगणात खेळत होते. अचानक दोन्ही भावांना मुंग्या चावला. दोन्ही मुलांची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी दोन्ही मुलांना जिल्हा रुग्णालयात आणले. जिल्हा रुग्णालयातून मिळालेल्या माहितीनुसार, तीन वर्षीय सागरचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. प्रियांशूवर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यावर कुटुंबीयांनी त्याला शुक्रवारी घरी नेले.
 
दोन्ही मुलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार करणारे डॉ.राहुल मिश्रा म्हणाले की, गुरुवारी रात्री 8.57 वाजता कुटुंबीय मुलांना घेऊन जिल्हा रुग्णालयात पोहोचले. त्यांनी मुलांची तपासणी केली. सागरचा आधीच मृत्यू झाला होता. प्रियांशूवर उपचार करण्यात आले. वडील भूपेश राम यांनी सांगितले की, मोठ्या लाल रंगाच्या विषारी मुंग्यांनी मुलांना चावा घेतला होता. कुटुंबातील सदस्यांनी मुलांना रुग्णालयात नेण्यात उशीर केल्याचे सांगण्यात येत आहे. 
 
Edited By - Priya Dixit