शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2023 (17:37 IST)

स्टंट करताना पडला दुचाकीस्वार आणि ...

सध्या सोशल मीडियावर काहीसे हटके करण्याचे वेड लागले आहे. लोक प्रसिद्धी मिळवण्यासाठी नको ते धाडस करतात आणि आपला जीव धोक्यात आणतात.लोक बाईकवर देखील असे स्टंट करतात आणि त्यांना नको ती किंमत मोजावी लागते. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्याला पाहून अंगाचा थरकाप उडतो. हा व्हिडीओ fullrusticos इंस्टाग्रामच्या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ मध्ये दोन तरुण बाईकवर बसून रस्त्यावरून स्टंट करून जात असताना त्यांची गाडी मागच्या बाजूस उलटली. त्यांना वाटलं की ते आरामात त्यातून बाहेर पडतील. मात्र मागून वेगात कार आली.आणि त्यांना धडक दिली. स्टंट करणाऱ्याच्या मागे बसलेल्या तरुणाचं डोकं कार मध्ये अडकलं. नंतर तो तरुण कार मधून डोकं. काढण्याच्या प्रयत्न करत आहे. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे.     
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Javier M. | Offroad 4x4