शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 17 डिसेंबर 2023 (13:20 IST)

ऑर्डर केलेल्या जेवणात आढळली जिवंत गोगलगाय

Snail
सध्या ऑनलाईन ऑर्डर करून जेवण मागवायचे ट्रेंड सुरु आहे. बजेट मध्ये पटकन आपली आवडती डिश मागवू शकतो. झोमॅटो, स्वीगी या वरून खाण्याचे ऑर्डर घेतले जाते. बंगळुरू मध्ये एका व्यक्तीने खाण्याचे ऑनलाईन ऑर्डर केले. त्याने ऑर्डर करून सॅलेड मागवले. त्याने ऑर्डर केलेल्या खाद्य पदार्थात चक्क जिवंत गोगलगाय आढळली. 
 
हे संपूर्ण प्रकरण बंगळुरूचे आहे. धवल सिंह नावाच्या व्यक्तीने स्विगीमधून सॅलडची प्लेट ऑर्डर केली. तथापि, त्याला सॅलडमध्ये एक गोगलगाय फिरताना दिसला आणि त्याबद्दल लिहिण्यासाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर जाऊन पोस्ट केले.  पोस्टला कॅप्शन दिले होते, ""@LeonGill कडून पुन्हा कधीही ऑर्डर देत नाही!" @SwiggyCares हा गोंधळ इतरांना होणार नाही याची खात्री करण्यासाठी जे काही करता येईल ते करा.बंगळुरूचे एसआयसी लोकांनी लक्ष द्या. ''त्यांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओत सॅलड मध्ये जिवंत गोगलगाय फिरताना दिसत आहे. 

या वर स्वीगीने प्रतिक्रिया दिली. "हॅलो धवल हे जे काही आहे ते खूपच भयावह आहे. कृपा करून आपल्या ऑर्डर आयडीसह आम्हाला सहयोग करा. जेणे करून आम्ही या वर लक्ष देऊ. 
धवलच्या या पोस्ट वर नेटकरी आपापली प्रतिक्रिया देत आहे. एकाने लिहिले हे  फ्रेंच रेस्तराँ आहे का, गोगलगाय खूप चविष्ट असणार. 
 
 
 
Edited by - Priya Dixit