1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (12:20 IST)

युपी मध्ये खाजगी रुग्णालयात अचानक लागली आग

fire
उत्तर प्रदेशमधील बागपत जिल्ह्यात बडौत क्षेत्रामध्ये आस्था रुग्णालयाच्या वरील मजल्याला सोमवारी सकाळी अचानक आग लागली. कर्मचारी आणि चिकिस्तकांनी वेळेवर फायर ब्रीग्रेड यांना सूचना दिली. वेळेवर पोहचलेल्या फायर ब्रिगेडने कर्मचारी आणि 15 मुलांसकट रुग्णांना बाहेर काढले. जलद केल्या गेलेल्या या कारवाईमुळे सुदैवाने कोणालाही नुकसान झाले नाही. 
 
तसेच रुग्णालयातील रुग्णांना तातडीने दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात आले. बागपतचे मुख्य अग्निशामक अधिकारी अमरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले की, सूचना मिळाल्या नंतर टीमच्या चार गाड्या रुग्णालयासाठी रवाना झाल्यात  तसेच या आगीच्या विळख्यातून रुग्णांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. तसेच आगीवर नियंत्रण मिळ्वण्यात यश आले आहे. तसेच आग लागण्याचे कारण आजून समोर आले नाही.

पण चाईल्ड केयर युनिट डॉक्टर यांनी सांगितले की, पहाटे त्यांना आग लागण्याची सूचना मिळाली. व ते लागलीच रुग्णालयात पोहचले. वरील मजल्यावर आग लागली होती व त्याखालील मजल्यावर 15 मुलांवर उपचार सुरु होते. तसेच फायर बिग्रेड वेळेवर आल्याने त्यांनी कर्मचारी, रुग्णांना बाहेर काढले व सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. 

Edited By- Dhanashri Naik