शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 5 ऑगस्ट 2017 (11:13 IST)

मृत्यू प्रमाणपत्रासाठी आधारकार्ड बंधनकारक

आता केंद्र सरकारने मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठीही आधार कार्ड बंधनकारक केले आहे. १ ऑक्टोबर २०१७ पासून हा निर्णय लागू होणार असून मृत्यू झालेल्या व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांकही मृत्यूचा दाखला काढताना द्यावा लागणार आहे. शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल इंडियाने पत्रक काढून मृत्यूच्या दाखल्यासाठीच्या नवीन नियमाची माहिती दिली. मृत्यूचा दाखला काढताना मयत व्यक्तीचा आधार कार्ड क्रमांक द्यावा लागणार आहे. यामुळे मयत व्यक्तीच्या आधार कार्डचा गैरवापर होणार नाही, तसेच त्या व्यक्तीविषयीची माहितीही सरकारकडे उपलब्ध असेल असे सूत्रांनी सांगितले. तसेच मयत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी विविध कागदपत्रे सादर करण्याची गरज राहणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. मेघालय, आसाम आणि जम्मू काश्मीर वगळता देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी हा निर्णय लागू असेल.