शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

सिद्धू मानवी बॉम्बसारखे: सुखबीरासिंग बादल

नवी दिल्ली- ‘आवाज-ए-पंजाब’ संघटनेची स्थापना करून पंजाबचे राजकारण घुसळून काढणारे माजी क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धू यांच्यावर पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल यांनी जोरदार टीका केली आहे. नवज्योत सिद्धू हे चंचल मनोवृत्तीचे असून एखाद्या मानवी बॉम्बसारखे आहेत. एक दिवस या बॉम्बचा स्फोट होईल आणि त्याच्या जवळ असलेल्यांची शिकार होईल, अशी खरमरीत टीका बादल यांनी केली आहे.
 
भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दलाशी असलेल्या मतभेदामुळे भाजपला सोडचिठ्ठी देऊन सिद्धू यांनी स्वत:ची संघटना स्थापन केली आहे. ही संघटना अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाशी आघाडी करणार अशी चर्चा सुरुवातीला होती. मात्र, आता सिद्धू यांची काँग्रेससोबत बोलणी सुरू असल्याचे बोलले जात आहे.