मंगळवार, 30 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (10:59 IST)

महिलेच्या डोळ्यांसह शरीरातून चक्क 3 जिवंत माशा काढल्या

दिल्लीच्या वसंत कुंज येथील फोर्टिस रुग्णालयातील डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून अमेरिकेतील 32 वर्षीय महिलेच्या शरीरातून तीन जिवंत माशा काढल्या गेल्या. एक माशी उजव्या डोळ्याच्या पापणीतून, दुसरी मानेच्या मागील भागातून आणि तिसरी उजव्या हाताच्या कातडीतून काढण्यात आली. पापणीतून काढलेल्या माशीचा आकार दोन सेंटीमीटर होता. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी महिला रुग्णावर शस्त्रक्रिया केली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
 
हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी असेही सांगितले की, नुकतीच अॅमेझॉनच्या जंगलांना भेट दिलेल्या या अमेरिकन महिलेच्या डोळ्यात मायियासिस (एक प्रकारचा संसर्ग) झाल्याचे दुर्मिळ प्रकरण आढळले. त्यानंतर तपास सुरू झाल्यानंतर खासगी सुविधेत यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. ऑपरेशन दरम्यान, 32 वर्षीय महिलेकडून "सुमारे 2 सेमी आकाराचे तीन जिवंत माशा" काढण्यात आले. मायियासिस हा मानवी ऊतींमधील माशीच्या लार्वा (मॅगॉट) संसर्ग आहे.
 
रुग्णाच्या शरीरातून जिवंत माशा काढण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पीडित महिलेच्या उजव्या डोळ्याच्या पापणीला चार ते सहा आठवड्यांपासून सूज आली होती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. भारत दौऱ्यादरम्यान तिने उपचारासाठी फोर्टिस हॉस्पिटल गाठले. ही महिला प्रवासी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दोन महिन्यांपूर्वी ती अॅमेझॉनच्या जंगलात फिरायला गेली होती.
 
यादरम्यान त्याच्या उजव्या पापणीच्या वरच्या भागाला काही किटकांनी चावा घेतला होता. डॉक्टरांचे म्हणणे आहे की माशा शरीराच्या कोणत्याही भागावर असलेल्या जखमांमधून त्वचेत प्रवेश करू शकते. रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागाच्या प्रमुखांनी सांगितले की, माशांमुळे नाक, चेहरा आणि डोळे यांना नुकसाव होऊ शकले असते. याशिवाय, त्याच्या संसर्गामुळे मेंदुज्वर होण्याचा धोका असतो, जो रुग्णासाठी घातक ठरू शकतो.