पुन्हा अबू आझमी यांनी केले वादग्रस्त विधान
समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी पुन्हा वादग्रस्त विधान केले आहे. विनयभंगाच्या घटनांसाठी आझमी यांनी महिलांनाचं जबाबदार धरले आहे. सध्याच्या दिवसांमध्ये तोकडे कपडे घालणा-या महिलांना फॅशनेबल, आधुनिक आणि सुशिक्षित ठरवले जाते. आपल्या देशात हे प्रमाण वाढत आहे असे आझमी म्हणाले. आझमी यांनी अशा प्रकारचे विधान करण्याचीही पहिली वेळ नाही. यापूर्वीही त्यांनी अशा प्रकारची वादग्रस्त विधाने केली आहेत. नववर्षाच्या पूर्वसंध्येला बंगळुरुमध्ये मोठया प्रमाणावर महिलांचा विनयभंग, छेडछाडीच्या घटना घडल्या. त्यावर ते बोलत होते.