1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 12 मे 2023 (16:02 IST)

Agra News : विमानातून उडी मारून पॅराशूट हाय टेंशन वायरमध्ये अडकला

bijali
उत्तर प्रदेशातील आग्रा येथे शुक्रवारी पॅराशूट जंपिंग करताना मोठा अपघात झाला. येथे हजारो फूट उंचीवरून उडी मारल्यानंतर जवान पॅराशूटच्या मदतीने खाली उतरत होते. त्याच वेळी, जोरदार वाऱ्यात पॅराशूट ड्रॉपिंग झोनपासून वेगळे झाले. अंधारामुळे जवानाला काही समजले नाही. दरम्यान, पॅराशूट हाय टेंशन लाइनच्या पकडीत अडकले. यानंतर पॅराशूटला आग लागली, त्यामुळे जवान होरपळला  आणि खाली पडला. लोकांनी ते पाहिल्यावर त्यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून अॅम्ब्युलन्स बोलावून  जवान ला रुग्णालयात नेले, जिथे ते वाचू शकले नाही. 
अंकुश शर्मा असे या जवानाचे नाव आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार, आग्रा येथील मालपुरा येथे हवाई दलाच्या ड्रॉपिंग झोनमध्ये उडी मारताना जवानाचे पॅराशूट हाईटेन लाइनमध्ये अडकले. यानंतर जवान अंकुश शर्मा जमिनीवर पडला आणि गंभीर जखमी झाला. ही घटना काल रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. रात्री शेतातील ट्यूबवेलवर बसले असता लगेचच महेंद्रसिंग, रुपकिशोर आणि धर्मेंद्रसिंग यांना त्यांच्या समोर फुग्यासारखे काहीतरी जळत असल्याचे दिसले जेव्हा हे सर्व लोक जळत्या फुग्याजवळ पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिले की एक तरुण जमिनीवर पडलेला होता आणि वेदनेने ओरडत होता. त्यानंतर लगेचच या चौघांनी जवान अंकुश शर्माला उचलून थेट लष्करी रुग्णालयात उपचारासाठी नेले. दरम्यान, वाटेत त्यांनी फोनवरून पोलिसांनाही या प्रकरणाची माहिती दिली 
 
जवानअंकुश शर्मा यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांच्या नाकातून रक्त येत होते. जवान अंकुश शर्माचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. कमांडो अंकुश शर्मा काश्मीरमध्ये तैनात असलेल्या लष्करी रेजिमेंटमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली, त्यानंतर त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.  
 
 गावकरी महेंद्र सिंह यांनी सांगितले की, जेव्हा आम्ही पाहिले की एक फुगा हाय टेंशन लाइनमध्ये अडकला होता आणि जवान खाली जमिनीवर होता. आम्ही तात्काळ घटनास्थळी पोहोचलो आणि रुग्णवाहिका बोलावली. रुग्णवाहिका आल्यानंतर आम्ही तातडीने जवानाला उपचारासाठी रुग्णालयात नेले 








Edited by - Priya Dixit