सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : मंगळवार, 4 ऑक्टोबर 2022 (15:50 IST)

भारताचा पुढील पंतप्रधान शीख किंवा मराठा बनणार - माजी RAWप्रमुख

/amarjeet-singh-dulat
भारताचा पुढील पंतप्रधान शीख व्यक्ती बनेल, जर शीख व्यक्ती पंतप्रधान बनला नाही तर मराठा नक्कीच देशाचा पंतप्रधान बनू शकतो, असं वक्तव्य RAW चे माजी प्रमुख अमरजीत सिंह दुल्लत यांनी केलं आहे.
 
दुल्लत यांना पुण्याच्या सरहद्द संस्थेकडून संत नामदेव राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. याप्रसंगी ते बोलत होते.
 
यावेळी संत नामदेव यांचं कार्य सर्वव्यापी असल्याचं प्रतिपादन दुल्लत यांनी केलं. पुढे बोलताना देशाच्या पुढील पंतप्रधानपदावर मराठा व्यक्ती असू शकतो, असं ते म्हणाले.