मंगळवार, 13 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (11:11 IST)

अॅमेझॉनने तिरंग्याचा अपमान करणारे पायपुसणीची विक्री अखेर थांबवली

amazon flag
परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर अॅमेझॉनने साइटवरील भारताच्या राष्ट्रध्वजाचा अपमान करणा-या पायपुसणीची विक्री अखेर थांबवली आहे.
 
याआधी कॅनडातील अॅमेझॉनच्या वेबसाईटवर भारताच्या राष्ट्रध्वजासारखी पायपुसणी विक्रीला ठेवण्यात आली होती. ही गोष्टएका नागरिकाने निदर्शनास आणून दिली. त्यानंतर  याची दखल घेत स्वराज यांनी त्या पायपुसण्यांची विक्री त्वरित थांबवण्यास आणि बिनशर्त माफी मागण्यास सांगितले होते. 'आमच्या तिरंग्याचा अपमान करणा-या सर्व उत्पादनांना त्वरित हटवा अन्यथा आम्ही अॅमेझॉनच्या अधिका-यांना व्हिसा देणार नाही तसेच सध्या ज्या अॅमेझॉनच्या कर्मचाऱ्यांकडे भारताचा व्हिसा आहे, त्यांचा व्हिसा रद्द करू', असा इशारा स्वराज यांनी ट्विटरद्वारे दिला होता.