शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 12 जून 2017 (23:07 IST)

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवार चाचपणी सुरु

राष्ट्रपती निवडणुकीसाठी भाजपने सहमतीचा उमेदवार देण्याबाबत चाचपणी करायला सुरुवात केली आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी तीन सदस्यांची समिती नेमली आहे. केंद्रातल्या तीन वरिष्ठ मंत्र्यांचा यात समावेश आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली आणि केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांचा या समितीत समावेश आहे. राष्ट्रपतीपदाबाबत सहमतीचा उमेदवार निवडण्यासाठी विविध राजकीय पक्षांशी चर्चा करण्याची जबाबदारी या तिघांवर सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे केवळ एनडीएच नव्हे, तर इतर विरोधी पक्षांशीही चर्चा ही समिती करणार आहे. दिल्लीत राष्ट्रपतीपदावरुन हालचाली सुरु झाल्या. अमित शहांनी आपला नियोजित अरुणाचल दौरा रद्द करुन, आधी या समितीच्या स्थापनेसाठी बैठक घेतली.