शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 28 जानेवारी 2023 (13:08 IST)

राजस्थानच्या भरतपूरमध्ये हवाई दलाचे विमान कोसळले

राजस्थानच्या भरतपूरमध्ये एक चार्टर्ड विमान अपघाताचा बळी ठरलं आहे. तांत्रिक बिघाडामुळे विमान कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. या विमानाने उत्तर प्रदेशातील.आग्रा येथून उड्डाण केले होते आणि भरतपूर जिल्ह्यातील उछैन भागात हा अपघात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर होते की लढाऊ विमान आणि त्यात जीवित व वित्तहानी झाली हे लगेच स्पष्ट होऊ शकले नाही.
 
उत्तर प्रदेशातील आग्रा येथून उड्डाण करणारे हेलिकॉप्टर राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील उछैन भागात कोसळले आहे स्थानिक लोक घटनास्थळी पोहोचले. 
 
या अपघाताचा व्हिडीओही समोर आला असून त्यात विमानाचा ढिगारा जळताना दिसत आहे. भरतपूरचे जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी यापूर्वी हे चार्टर जेट असल्याची केली होती. मात्र हे विमान हवाई दलाचे आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 
 
जिल्हाधिकारी आलोक रंजन यांनी सांगितले की, भरतपूरमध्ये चार्टर्ड विमान कोसळले. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. 
पायलटने स्वतःला बाहेर काढले होते. मात्र, अद्याप त्याचा शोध लागलेला नाही. त्याच्या शोधासाठी पथके जमा झाली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हवाई दलाच.ते संरक्षण लढाऊ विमान होते की हेलिकॉप्टर. त्यामुळेच याबाबत आताच काही सांगणे कठीण आहे. 
 
 
 
Edited By- Priya Dixit