सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2023 (19:20 IST)

साळुंबरमध्ये विजेचा धक्का बसलेल्या व्यक्तीला वाचवण्यात अख्ख कुटुंब संपलं

current shock
राजस्थानमधील सालुंबर जिल्ह्यातील लसादिया उपविभागाच्या डिकिया ग्रामपंचायतीमध्ये काल संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. डिकिया ग्रामपंचायतीच्या बोडफळा येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील चौघांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. मृतांमध्ये कुटुंबप्रमुख, त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीचा समावेश आहे. ओंकार मीना (68), त्यांची पत्नी भंवरी देवी (65), मुलगा देवी लाल (25) आणि मुलगी मांगी देवी (22) अशी मृतांची नावे आहेत.
 
बोडफळा येथे राहणाऱ्या ओंकार मीनाचे कुटुंबीय घरी उपस्थित होते. यादरम्यान जवळच्या खांबामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने घरात विद्युत प्रवाह पसरला. ओंकारचे वडील गंगा मीना (वय 68) हे विजेच्या धक्क्याने गंभीररित्या भाजले. त्यांची पत्नी भंवरी मीना, मुलगा देवीलाल आणि मुलगी मंगी त्यांना वाचवण्यासाठी धावले, मात्र  चौघांना विजेचा धक्का बसून चौघांचा जागीच मृत्यू झाला. 
 
शेजारच्यांनी या घटनेची माहिती डिकियाच्या सरपंचाना दिली त्यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यावर पोलीस  घटनास्थळी पोहोचले तो पर्यत अख्ख कुटुंब संपलं होत.पोलिसांनी मृतदेह  ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी  शवागारात ठेवले आहे. पोलीस घटनेचा तपास करत आहे. दिवाळीच्या पूर्वी घडलेल्या  घटनमुळे परिसरात शोकाकुल वातावरण झाले आहे. 
 




Edited by - Priya Dixit