शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 12 डिसेंबर 2018 (09:22 IST)

येत्या ८ व ९ जानेवारीला राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद

केंद्र शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या मानधनात वाढ जाहीर केली असून राज्य शासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ राज्यातील हजारो अंगणवाडी कर्मचाऱ्यानी मंगळवारी आझाद मैदानात निदर्शने केली. तसेच पुढील महिन्यापर्यंत मानधनवाढ फरकासह न मिळाल्यास ८ व ९ जानेवारीला राज्यातील सर्व अंगणवाड्या बंद ठेवण्यात येतील. त्यानंतर फेब्रुवारीत जेल भरो करू, असा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला.
 
कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबरमध्ये सिधी बात कार्यक्रमात अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनवाढीची घोषणा केली. १ आॅक्टोबरपासून ती अंगणवाडी सेविका मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना मिळायला हवी होती. घोषणेच्या दोन महिन्यांनंतरही मानधनवाढीची प्रतीक्षा कायम आहे. म्हणूनच केंद्रीय कामगार संघटनांनी ८ व ९ जानेवारीला पुकारलेल्या देशव्यापी संपात उतरण्याचा निर्णय अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे.