सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 27 नोव्हेंबर 2018 (08:36 IST)

चिदंबरम पिता- पुत्र यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजुरी

एअरसेल मॅक्सिस घोटाळा प्रकरणात पी चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ति चिदंबरम यांच्याविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती सीबीआयने कोर्टात दिली आहे. दिल्लीच्या पतियाळा हाऊस कोर्टाने पी. चिदंबरम आणि कार्ति चिदंबरम या दोघांना दिलेला अंतरिम जामीन १८ डिसेंबर वाढवण्यात आला आहे. त्याचवेळी सीबीआयने कोर्टात स्पष्ट केले की या दोघांविरोधात खटला चालवण्यास मंजुरी दिल्याचे सीबीआयने म्हटले आहे.
 
पी. चिदंबरम यांच्याविरोधात अंमलबजावणी संचलनालयाने एक पुरवणी चार्जशीट दाखल केली आहे. या चार्जशीटमध्ये पी. चिदंबरम यांना आरोपी क्रमांक १ असे म्हटले गेले आहे. एवढेच नाही तर या चार्जशीटमध्ये इतर ८ जणांची नावंही आहेत. एअरसेल मॅक्सिस खटल्यात पतियाळा हाऊस कोर्टाने सोमवारी सुनावणी घेतली. याच प्रकरणात सीबीआयनेही वेगळी चार्जशीट दाखल केली आहे.