सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 9 डिसेंबर 2016 (14:48 IST)

महाराष्ट्राचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना भेटले : जिल्हा बॅंकेवरील निर्बंध उठवण्याची मागणी

राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांवर चलनबंदीच्या निर्णयानंतर घालण्यात आलेले निर्बंध उठविण्यासह या बँकांना जास्तीत जास्त चलन पुरवठा करण्याच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री  अरुण जेटली यांना भेटले  आहेत. तर यावेळी  अरुण जेटली  यांनी  पूर्ण समस्या एकूण घेतल्या असून लवकरच निर्बंध उठवता येतील असे संकेत दिले आहेत. त्यामुळे ग्रामीण भागतील नागरिकांची होणारी प्रवाद थांबणार आहे.
 
केंद्रीय अर्थमंत्री यांना  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  सोबत राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सहकारमंत्री सुभाष देशमुख, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे - पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, मुंबई बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर, आ. जयंत पाटील, स्वाधीन क्षत्रिय आदी नेत्यांनी भेट घेतली आहे.