शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2022 (12:10 IST)

मृत घोषित केलेलं बाळ जिवंत

baby
जम्मू-काश्मीरमधील सरकारी हॉस्पिटलमधून निष्काळजीपणाचे मोठे प्रकरण समोर आले आहे. बनिहाल येथील रुग्णालयात सोमवारी महिलेने एका बाळाला जन्म दिला.जन्मानंतर मुलीला मृत घोषित करण्यात आले.मुलीला रुग्णालयातून नेण्यास सांगितले. मुलीला रुग्णालयातून आणल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर मुलीला कबरीत पुरण्यात आले. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे मुलीची कबर खोदली असता ती मुलगी जिवंत असल्याचे आढळून आले. रुग्णालयाच्या निष्काळजीपणा बद्दल लोकांचा संताप झाला. या प्रकरणी रुग्णालयातील दोन जणांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला आहे.