रविवार, 5 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 8 डिसेंबर 2016 (17:14 IST)

तीन दिवस बँकांचे व्यवहार ठप्प

दुसरा शनिवार, रविवार आणि सोमवारी (ईद-ए-मिलाद) शासकीय सुटी असल्याने सलग ३ दिवस बँकांचे  व्यवहार ठप्प होणार आहेत. दर महिन्याच्या १ ते ८ तारखेदरम्यान पेन्शनधारक, शासकीय तसेच विविध आस्थापनांच्या कर्मचार्‍यांचे वेतन बँकेत जमा केले जातात. मात्र अनेक ठिकाणी वेतन जमा करूनही केवळ नोटा नसल्याने पगार होऊनही कर्मचार्‍यांची पंचाईत झाली आहे. त्यातच आता शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग ३ दिवस बँका बंद राहणार आहे.  त्यामुळे नागरीकांना  मोठय़ा अडचणींना सामोरे जावे लागण्याची शक्यता  आहे.