1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 23 जून 2024 (15:17 IST)

इंदूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

मध्य प्रदेशातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची युवा शाखा भारतीय जनता युवा मोर्चा (BJYM) च्या इंदूर युनिटच्या एका नेत्याची शनिवार- रविवारच्या मध्यरात्री दोन जणांनी गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मोनू कल्याणे(35) असे या मयत नेत्याचे नाव आहे. जुन्या वैमनस्यातून ही हत्या केल्याचे बोलले जात असून आरोपींची ओळख पटली असून अर्जुन आणि पियुष अशी त्यांची नावे आहे. दोघांचा शोध पोलीस घेत आहे..

सदर घटना एमजी रोड पोलिस स्टेशन परिसरात घडली. दोघांनी मोनू यांची गोळ्या झाडून हत्या केली. रविवारी शहरात काढण्यात आलेल्या भगवा यात्रेचे झेंडे आणि बॅनर कल्याणे यांना मिळत असतानाच हे घडले. कल्याणे यांच्या हत्येनंतर त्यांच्या समर्थकांनी आरोपींच्या घरात घुसून तोडफोड केली आणि वाहने जाळण्याचा प्रयत्न केला.पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून आरोपींचा शोध घेत आहे.मोनू कल्याणे हे राज्यमंत्री कैलाश विजयवर्गीय यांचे निकटवर्ती होते. 

Edited by - Priya Dixit