सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 9 ऑक्टोबर 2018 (16:26 IST)

भिलाई स्टील प्रकल्पामध्ये स्फोट, ९ ठार

bhelai sfot
छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यातील भिलाई स्टील प्रकल्पामध्ये गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला. यामध्ये 9 लोकांचा मृत्यू झाला असून 14 जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जवळच्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या कारखान्यावर स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाचे नियंत्रण आहे. या स्टील कारखान्यामध्ये गॅस पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येत होती. यावेळी एका मोठ्या स्फोटात 6 कामगारांचा मृत्यू झाला तर 14 जण गंभीर जखमी झाले. हा प्रकल्प रायपूरपासून केवळ 30 किमी दूर आहे. स्फोटानंतर कारखान्याला मोठी आग लागली आहे. घटनास्थळी 8 ते 10 अग्ऩिशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरु आहेत.