1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 3 एप्रिल 2018 (09:12 IST)

सावळ्या मुलाला गोरे करण्यासाठी चक्क दगडाने घासले

bhopal
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये एक महिलेने तिच्या पाच वर्षांच्या सावळ्या मुलाला गोरं करण्यासाठी त्याला चक्क दगडाने घासल असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधा तिवारी असं आरोपी महिलेचं नाव असून तिने मुलाला दत्तक घेतलं होतं. गोरं करण्यासाठी महिला त्याचं शरीर दगडाने घासत होती, अशी माहिती चाईल्ड लाईनला मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि लाईल्ड लाईनने या मुलाची सुटका केली. महिलेच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने ही माहिती चाईल्ड लाईनला दिली होती.

आरोपी महिलेने उत्तराखंडच्या मातृछायामधून दीड वर्षांपूर्वी या मुलाला दत्तक घेतलं होतं. आरोपी सुधा तिवारी व्यवसायाने शिक्षिका असून ती सरकारी शाळेत शिकवते. तर महिलेचा पती खासगी रुग्णालयात काम करतो, असं तक्रारदार शोभना शर्माने सांगितलं.

शोमना शर्मा म्हणाल्या की, "सुधाने ज्या दिवसापासून मुलाला भोपाळमध्ये आणलं, त्यादिवसापासून तिला त्याचा सावळा रंग पटत नव्हता. तिने मुलावर खूप उपचार केले. सुमारे एक वर्षापूर्वी कोणीतरी तिला सल्ला दिला की, मुलाला काळ्या रंगाच्या दगडाने घासलं तर तो गोरा होऊ शकतो. यानंतर महिलेने मुलाचं शरीर काळ्या रंगाच्या दगडाने घासायला सुरुवात केली. पण यामुळे मुलाच्या मनगट, खांदा, पाठ आणि पायांना जखम झाली आहे."