बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

चारा घोटाळा प्रकरणात खटला चालणार

बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाने जोर का झटका दिला आहे. देशभरात गाजलेल्या 900 कोटी रूपयांच्या चार घोटाळा प्रकरणी वेगवेगळ्या कलामान्वये त्यांच्यावर खटला चालवला जाणार असून गुन्हेगारी कट रचल्याचा ठपकाही त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
 
चारा घोटाळा प्रकरणी झारखंड उच्च न्यायालयाने लालूंवरील काही महत्त्वाची कलमे हटवली होती. त्याविरोधात सीबीआयने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती.