1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 11 जुलै 2023 (19:04 IST)

Bihar : टक्कल लपवणाऱ्या नवरदेवाचे भिंग फुटले

बिहारच्या गया मध्ये पहिली पत्नी जिवंत असताना एक व्यक्ती दुसरं लग्न करण्यासाठी पोहोचला. मुलीला त्याच्या लग्नाची माहिती मिळाली आणि ती थेट लग्नमांडवात पोहोचली. भिंग फुटल्यावर व्यक्तीला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती सेहरा बांधून लग्नासाठी तयार होऊन बसली आहे. 
नंतर लोकांनी संतापून नवरदेवाला मारहाण करण्यास सुरुवात केली. नंतर एक ज्येष्ठ व्यक्ती त्याला मारहाण करतो आणि काही लोक सुद्धा मदतीला येत आहे. 

तो त्याला म्हणत आहे की हे अजून कुठलं गाव असलं असत असं म्हणत आहे. या दरम्यान नवरी वारंवार हात जोडून माफी मागत आहे. कोणी तरी म्हटले की या नवरदेवाची टक्कल करा. तेव्हा या नवरदेवाची टक्कल असल्याचे समजले आहे. 

या नंतर लोक संतापून त्याचे केस ओढतात. हा व्यक्ती बनावट केस  घालून लग्नासाठी पोहोचला आहे. लोकांनी त्याला बेदम मारहाण करण्यास सुरु केले. पहिली पत्नी जिवंत असताना दुसरे लग्न करण्यासाठी पोहोचलेल्या या व्यक्तीला मारहाण केली. हा व्यक्ती कोतवाली पोलीस ठाण्याच्या इकबाल नगरचा रहिवासी आहे. 
 
कोणीतरी टक्कल असणाऱ्या नवरदेवाच्या  मारहाणीचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. आता हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या टक्कल वराची चर्चा संपूर्ण परिसरात होत आहे. मात्र, काही लोकांनी मध्यस्थी करून त्याला वाचवले आणि प्रकरण मिटवले. 



Edited by - Priya Dixit