शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 8 डिसेंबर 2021 (18:41 IST)

Bipin Rawat passed away: सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे कुन्नूरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून अपघाती निधन झाले

भारतीय हवाई दलाने सीडीएस जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. या अपघातात पत्नी मधुलिका रावत यांच्यासह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. आज त्यांच्या हेलिकॉप्टरला तामिळनाडूतील कुन्नूर येथे अपघात झाला. त्यांची पत्नी मधुिलका रावत याही त्यांच्या सोबत होत्या. 
हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी मधुलिका रावत आणि 11 लष्करी जवानांचा मृत्यू झाल्याचे हवाई दलाने ट्विट केले आहे. 

तसेच संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सीडीएस रावत यांच्या निधनावर शोक व्यक्त केला. तामिळनाडूमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस रावत आणि त्यांची पत्नी आणि अन्य 11 अधिका-यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले आहे, असे त्यांनी ट्विट केले.