मंगळवार, 31 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 मे 2024 (12:25 IST)

भाजप आमदाराच्या नातवाची आत्महत्या

poison
मध्य प्रदेशमधील इंदोर मधून एक दुःखद बातमी समोर आली आहे. भाजपचे आमदार यांच्या नातवाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या मृत तरुणाचे नाव विजय दांगी आहे. 19 वर्षाचा हा तरुण विजय याने विष खाऊन आपला जीव दिला आहे. तसेच विजयच्या मृत्यूचे खरे कारण समोर आलेले नाही. पण आत्महत्या करण्यापूर्वी त्याने एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती ज्याच्या आधारावर पोलीस पुढील तपास करीत आहे. 
 
हे प्रकरण मध्यप्रदेशातील राजगड जिल्ह्याचे आहे राजगड मधील खिलचीपूर मधून भाजप आमदार हजारीलाल दांगी यांचा नातू विजय दंगी हा इंदोरमध्ये एलएलबीचे शिक्षण घेत होता. विजयने अचानक स्वतःला संपविले. पोलिसांना त्याच्या मृतदेहाजवळ सुसाईड नोट मिळाला. विजयने या नोट मध्ये लिहलेले आहे की कुटुंबाला त्रास देऊ नका. 
 
तसेच विजय याने सुसाईड नोट मध्ये लिहलेले की, मी माझ्या मर्जीने जात आहे. घरच्यांना त्रास देऊ नका. तसेच विजय याने आपल्या मृत्यूचे खरे कारण लिहले नाही. विजय याने विषारी पदार्थ खाऊन स्वतःला संपविले. पोलिसांनी मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला. तसेच पोलीस चौकशी करीत असून विजयच्या मृत्यूचे खरे कारण शोधत आहे.