शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: गुरूवार, 12 जानेवारी 2017 (17:14 IST)

पंजाब आणि गोवा निवडणुकीसाठी भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर

देशात इतर ५ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. पंतप्रधान मोदींसाठी ही एक कसोटी असेल. पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली उमेदवार यादी जाहीर केली. केंद्रीय आरोग्या मंत्री जे.पी नड्डा यांनी पत्रकार परिषद घेत ही यादी जाहीर केली. यात पंजाबसाठी १७ तर गोव्यासाठी २९ उमेदवारांची घोषणा झाली आहे. पंजाबमध्ये २३ जागांवर भाजप आपला उमेदवार  उभा करणार असल्याचा अंदाज आहे तर उरलेल्या ९४ जागांवर भाजपचा मित्रपक्ष शिरोमणी अकाली दल त्यांचे उमेदवार उभे करणार आहे. पंजाबमध्ये ११७ विधानसभा जागांसाठी मतदान होतंय. पंजाब आणि गोव्यामध्ये ४ फेब्रुवारीला मतदान आहे, तर ११ मार्चला निकाल लागणार आहेत.