ताणलेल्या युतीसाठी भाजपा करणार शिवसेनेसोबत चर्चा
युती मधील असलेले संबंध दिवसेंदिवस खराब होत आहेत. शिवसेना भाजपला अडचणीत आणत आहे. युतीतील तणावाचं वातावरण निवळावं यासाठी आता भाजप प्रयत्न करणार आहे. गुडी पाडवा झाला की लगेच . 29 मार्चला भाजपचे दोन मंत्री शिवसेनेबरोबर चर्चा करण्यासाठी जाणार आहेत. ते उद्धव ठाकरे याच्या सोबत चर्चा करणार आहेत. भाजपच्या नेत्यांकडून मध्यावधी निवडणुका घेतल्या जाव्या अशी मागणी होत आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फोडून त्यांना भाजपच्या चिन्हावर पुन्हा निवडून आणावं असाही पर्याय समोर ठेवण्यात आला. पण या दोन्ही पर्यायांवर बैठकीत 50-50% मतं पडली त्यामुळे यावर पक्षश्रेष्ठी निर्णय घेणार आहेत. त्यामुळे आता भाजपा चर्चा करत हा प्रश्न सोडवते की मध्यवती साठी तयार होते हे पाहावे लागणार आहे.