बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 14 नोव्हेंबर 2016 (10:41 IST)

व्यापारी भंगार आढळले ४ कोटी

black money
काळा पैसा आता बाहेर येऊ लागला आहे. महाराष्ट्रातील असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील भंगार व्यापाऱ्याजवळून ४ कोटींची रोकड हस्तगत करण्यात आली आहे. ही रोकड मध्यप्रदेशातील बुरहानपूर येथे घेऊन जात असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्यामुळे किती पैसा लोक बाळगत होते आणि कश्या प्रकारे  पैसा फिरवत होते हे समोर आले आहे.महाराष्ट्र – मध्यप्रदेशच्या सीमेवर तपासणी पथकाला भंगार व्यापारी शब्बीर हुसैन याच्या कारमध्ये ४ कोटींची रोकड सापडली आहे. आरोपीला बुरहानपूर पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तर आयकर विभागास ही महिती दिली असून  आता लवकर त्याचे इतर व्यवहार तपासले जाणार आहे.