मंगळवार, 30 डिसेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (11:23 IST)

'काळ्या' पैशांचा 'काळा बाजार' तेजीत

block money
भारतीय चलनातून पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा बाद ठरविण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर करताच अंडरवर्ल्डमध्ये जणू धरणीकंप झाला. हवाला, धमक्या, खंडणी, हप्ते यातून गोळा केलेली करोडो रुपयांची माया व्हाइट करण्यासाठी डॉन आणि त्यांच्या गँगस्टरनी मुंबईच्या मोठ्या बाजारपेठांतील व्यापाऱ्यांना हाताशी धरल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डॉनच्या नावाने धमकावत एक लाख रुपये व्यापाऱ्यांना देऊन त्यांच्याकडून १० हजार रुपये घेत, अंडरवर्ल्डमधील काळा पैसा व्हाइट करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.