रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 28 ऑगस्ट 2024 (18:46 IST)

फारुखाबादमध्ये दोन मुलींचे मृतदेह झाडाला लटकलेले आढळले, मृत्यूचे कारण उघड

death
उत्तर प्रदेशातील फर्रुखाबाद येथे दोन मुलींचे मृतदेह गावाबाहेर झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडले. या घटनेने आजूबाजूच्या लोकांना धक्का बसला. दोन्ही मित्र सोमवारी जन्माष्टमीच्या दिवशी मंदिरात गेल्या होत्या. दोन्ही मुलींच्या मृतदेहाचा शवविच्छेदनाचा अहवाल आला आहे. अहवालात मुलींचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला असून दोघानीं आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. 

शरीरावर कोणत्याही जखमा नाही. मुलींचा मृत्यू फाशी घेतल्याने झाला असल्याचे स्पष्ट झाले. मुलींवर बलात्कार झाला का हे तपासण्यासाठी एक स्लाईड बनवून तपासणीसाठी पाठवण्यात आली आहे. 
या मुलींनी असे टोकाचे पाऊल का घेतले याचा तपास पोलीस करत आहे. या मुली जवळच्या मैत्रिणी असून शेजारी राहत होत्या. 
शव विच्छेदनाचा अहवाल खोटा असल्याचे वडिलांनी म्हटले आहे. मयत मुलींच्या शरीरावर जखमा असल्याचा दावा मुलींच्या वडिलांनी केला आहे. अहवाल खोटे असल्याचे ते म्हणाले. 
Edited by - Priya Dixit