आसाम आणि मणिपूरमध्ये दोन बॉम्बस्फोट
प्रजासत्ताक दिनामुळे देशभरात कडक सुरक्षा तैनात असतानाही आसाम आणि मणिपूरमध्ये गुरूवारी (दि. २६) एकापाठोपाठ एक आठ बॉम्बस्फोट झाले. आसाममध्ये सहा तर मणिपूरमध्ये दोन स्फोट झाले. परंतु स्फोटांच्या कमी तीव्रतेमुळे त्यात कोणीही जखमी झाल्याचे किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. आसामचे पोलीस महासंचालक मुकेश सहाय्य यांनी दिलेल्या माहितीनुसार दहशतवाद्यांच्या कोणत्याही गटाने या स्फोटांची जबाबदारी घेतलेली नाही. मणिपूरमध्ये इंफाळच्या उत्तरेकडील भागातील मंत्रीपुखरी येथे एक स्फोट आणि मणिपूर महाविद्यालयाजवळ दुसरा स्फोट झाला. आसामच्या चराईदेव, शिवसागर, दिब्रूगड आणि तिनसुखिया जिल्ह्यात स्फोट झाले. दिब्रूगड येथे चौकीढींगी परेड मैदानापासून ध्वजवंदन होत असलेल्या जागेपासून ५०० मीटर अंतरावर स्फोट झाला. चराईदेव जिल्ह्यात पेट्रोल पंपाजवळ आणि बिहू बोर येथे स्फोट झाला. शिवसागर येथील लेंगीबोर आणि माजपंज येथे स्फोट झाले.