मंगळवार, 30 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 9 डिसेंबर 2024 (18:26 IST)

पश्चिम बंगालमध्ये बॉम्बस्फोट, 3 जणांचा मृत्यू

west Bengal
पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये सोमवारी देशी बॉम्ब बनवताना मोठा स्फोट झाल्याची घटना समोर आली आहे.पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची घटना घडली. या घटनेत ३ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपासात गुंतले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका घरात बेकायदेशीरपणे देशी बनावटीचे बॉम्ब बनवले जात होते. त्याचवेळी बॉम्बचा स्फोट होऊन 3 जणांना जीव गमवावा लागला.
 
मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील खैरतळा येथील रहिवासी मामून मुल्ला याच्या घरी रविवारी रात्री उशिरा अवैध बॉम्ब बनविण्याचे काम सुरू होते. दरम्यान अचानक बॉम्बचा स्फोट झाला. या काळात तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे
 
या प्रकरणाबाबत स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की, ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणाहून पोलिसांनी बॉम्ब बनवण्याचे अनेक साहित्य जप्त केले आहे. मात्र, घरावर बॉम्ब फेकण्यात आल्याचे मृताच्या नातेवाईकाचे म्हणणे आहे. तपास पोलीस करत आहेत.
Edited By - Priya Dixit