रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated : शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024 (15:02 IST)

शाळेत बॉम्बची धमकी, पोलीस घटनास्थळी

bomb threat
दिल्लीतील रोहिणी परिसरात एका शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली आहे. सकाळी 10:57 वाजेच्या सुमारास शाळेत बॉम्ब ठेवण्याची धमकी मिळाली. नंतर शाळेची झडती घेण्यात आली पोलिसांना तपास करताना काहीही सापडले नाही. पोलिसांनी पूर्ण तपास केल्यावर बॉम्बची धमकी खोटी निघाली 
 
शाळेच्या परिसराची झडती घेतल्यानंतर ही धमकी खोटी असल्याचे दिल्ली अग्निशमन सेवेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांना सकाळी 10.57 वाजता बॉम्बच्या धमकीचा ईमेल आला होता.

दिल्लीतील एका शाळेत बॉम्ब असल्याची बातमी आल्यानंतर घबराट पसरली होती. तत्काळ पोलिसांना कळवण्यात आले. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून तपास केला. 
पोलीस धमकी देणाऱ्याचा तपास करत आहे. शाळेत बॉम्ब नसल्याने सर्वानी सुटकेचा श्वास सोडला. 
 
Edited By - Priya Dixit