दिल्लीतील ११ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी; पथक तैनात
दिल्लीतील ११ शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी देणारे ईमेल आणि कॉल आले, ज्यात दक्षिण दिल्लीतील तीन शाळांचा समावेश आहे. माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस, अग्निशमन दल आणि बॉम्ब पथके तैनात करण्यात आली.
राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीमुळे खळबळ उडाली आहे. दक्षिण दिल्लीतील तीन शाळांसह राजधानीतील ११ हून अधिक शाळांना धमकी देणारे ईमेल आले आहे. संसदेवर हल्ल्यासाठी फाशी देण्यात आलेल्या दहशतवादी अफजल गुरूचाही उल्लेख करण्यात आला आहे.
दिल्लीतील नऊ शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमकीचे कॉल आल्याचे पोलिसांनी वृत्त दिले आहे. माहिती मिळताच, पोलिस प्रशासनाला सतर्क करण्यात आले आणि शाळांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली. दिल्ली पोलिस, अग्निशमन विभाग आणि बॉम्ब पथकाच्या पथकांना घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. शाळेच्या परिसराची कसून तपासणी सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik