1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 22 मे 2024 (20:52 IST)

Bomb Threat: गृह आणि अर्थ मंत्रालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी,नॉर्थ ब्लॉकमध्ये असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाला मेल

दिल्लीत पुन्हा बॉम्ब ने हल्ला करण्याची धमकीचा मेल आला आहे. या वेळी गृह मंत्रालय आणि अर्थ मंत्रालय मध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकी देण्यात आली आहे. नॉर्थ ब्लॉक मध्ये असलेल्या पोलीस नियंत्रण कक्षाला हा मेल मिळाला आहे. 
 
दिल्ली अग्निशमन सेवेला 3 वाजता ही माहिती मिळाली असून घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. दिल्ली पोलीस पथके सक्रिय झाली असून बॉम्बचा शोध घेण्यात आला असून घटनास्थळी कोणतीही संशयास्पद वस्तू आढळली नाही. या महिन्यात 22 दिवसात बॉम्बची धमकी देण्याची ही पाचवी घटना आहे. 

महिन्याच्या सुरुवातीला दिल्ली एनसी आर मधल्या 100 हुन अधिक शाळांमध्ये बॉम्बस्फोट करण्याची धमकीचा मेल आला होता. तसेच तिहार जेलला उडवण्याची धमकी आणि रुग्णालयांना उडवण्याची धमकीचे मेल करण्यात आले होते. घटनास्थळी सखोल तपास करण्यात येत आहे. यापूर्वीही शाळा, रुग्णालये, तिहार जेल, विमानतळ आणि उत्तर रेल्वेच्या सीपीआरओ इमारतीला अशा धमक्या आल्या आहेत.

दहशतवाद्यांनी अलीकडेच दीप चंद बंधू रुग्णालय, जीटीबी रुग्णालय, दादा देव रुग्णालय, हेडगेवार रुग्णालय आणि इतर रुग्णालयांना बॉम्ब हल्ल्याची धमकी देणारा ईमेल पाठवला होता. दिल्ली अग्निशमन विभागाकडून शोधमोहीम राबवण्यात आली पण काहीही संशयास्पद आढळले नाही. दरवेळेप्रमाणे ही धमकीही खोटी निघाली.

Edited by - Priya Dixit