शुक्रवार, 16 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: अमृतसर , सोमवार, 31 ऑक्टोबर 2016 (09:07 IST)

बीएसएफकडून पाक रेंजर्सला मिठाई नाही

bsf
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांमध्ये तणाव असल्याने यंदा अत्तारी-वाघा सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सला मिठाई देण्याचा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचे, सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) स्पष्ट केले. त्यामुळे दरवर्षी देण्यात येणारी मिठाई यावर्षी देण्यात येणार नसल्याचे बीएसएफने स्पष्ट केले.
 
भारत आणि पाकिस्तानमधील तणावाचे तीव्र पडसाद वाघा सीमेवरही पाहायला मिळाले असून दरवर्षी बीएसएफच्या जवानांकडून पाकिस्तानी रेंजर्सला मिठाई देण्यात येते. काश्‍मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांकडून शस्त्रसंधी उल्लंघन सातत्याने होत असून यामध्ये भारतीय जवान हुतात्मा झाले आहेत. शुक्रवारी पाकिस्तानी सैन्याने माछिल सेक्टरमध्ये केलेल्या गोळीबारात बीएसएफचे २ जवान हुतात्मा झाले होते.