चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीला क्रिकेट बॅटने मारहाण करून केली हत्या
तेलंगणातील संगारेड्डी येथे एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने आपल्या पत्नीची हत्या केली. संशयावरून झालेल्या भांडणात त्याने आपल्या असिस्टंट बँक मॅनेजर पत्नीला क्रिकेट बॅटने मारहाण केली. त्याला अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार तेलंगणातील संगारेड्डी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका रिअल इस्टेट व्यावसायिकाने आपल्या असिस्टंट बँक मॅनेजर पत्नीला क्रिकेट बॅटने मारहाण केली. पतीने तिच्या दुसऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतल्याने दोघांमध्ये वारंवार भांडणे होत होती.
सांगारेड्डी जिल्ह्यातील अमीनपूर पोलिस स्टेशन परिसरात ही घटना घडली. रविवारी सकाळी या संशयावरून जोडप्यात जोरदार वाद झाला. वादाचे रूपांतर लवकरच शारीरिक हाणामारीत झाले. पोलिसांनी सांगितले क्रूर पतीने आपल्या पत्नीला क्रिकेट बॅटने मारहाण केली व यात ती मरण पावली. घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. व आरोपी पतीला अटक करण्यात आली.

ALSO READ: 300 प्रवाशांना घेऊन जाणारी बोट उलटली
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: एकाच कुटूंबातील 5 जणांचा मृत्यू