रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'एकत्र निवडणूक लढवण्याचा विचार करू शकतो', 2024 च्या निवडणुकीबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य

2024 मध्ये लोकसभा निवडणुकीला अजून दोन वर्षे बाकी आहेत, पण राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत मोठे विधान केले की, समान किमान कार्यक्रमांतर्गत एकत्र निवडणुका लढविण्याचा विचार करता येईल आणि विरोधकांनी एकत्र यावे.
 
सरकारने 2014 मध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत : पवार
यासोबतच त्यांनी केंद्र सरकार आणि त्यांच्या धोरणांवरही हल्लाबोल केला. 2014 मध्ये दिलेली आश्वासने सरकारने पूर्ण केलेली नाहीत, असे सांगतानाच सर्व विरोधी पक्षांनी सध्याच्या सरकारसमोर एकजूट दाखवायला हवी. ते म्हणाले, "भाजपने पैशाचा आणि सीबीआय आणि ईडीचा गैरवापर करून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटकमधील आमदार फोडले आहेत. झारखंडमध्ये हाच प्रयत्न सुरू आहे. देशभरात हेच आहे, असे भाजपचे धोरण बनले आहे."
 
पुढील निवडणुकीत विरोधकांची एकजूट हवी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
पवार म्हणाले, "पुढील निवडणुकांमध्ये विरोधकांची एकजूट हवी, समान किमान कार्यक्रमाच्या आधारे निवडणुका लढवल्या गेल्या पाहिजेत. छोट्या पक्षांना सत्तेतून बेदखल करणे हेच भाजपचे उद्दिष्ट आहे. त्याचवेळी नितीशकुमार यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. वेगळे सरकार स्थापन केले. मी याचे स्वागत करतो." मात्र, विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न होण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही अनेक वेळा विरोधी पक्षांच्या नेत्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला आहे.