रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 26 मे 2021 (13:39 IST)

थरूर यांचे लोकसभा सदस्त्व रद्द करा : भाजप

टूलकिटप्रकरणी काँग्रेस खासदार आणि आयटी समितीचे सदस्य असलेल्या शशी थरूर यांच्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी टीकास्त्र सोडले आहे. त्यांना  आयटी समिती सदस्य पदावरून हटवण्यासह त्यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्याची मागणी दुबे यांनी केली आहे. यासाठी त्यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना पत्र लिहिले असून, संविधानातील दहाव्या अनुसूचीतील नियमांचा संदर्भ दिला आहे.
 
थरूर यांच्यामुळे संसद आणि भारताच्या प्रतिमेला तडा गेला आहे. कोरोना विषाणूच्या व्हेरियंटला भारताचे नाव ते वारंवार देत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याचे नाव इ.1.617 असे दिले आहे. त्यामुळे त्यांनी वापरलेल्या शब्दामुळे भारताची प्रतिमा डागाळत आहे. भारत सरकारने या शब्दावर आक्षेप घेतला आहे.