Daily Horoscope

निजामुद्दीनमधल्या आयोजक मौलानासह सहा जणांवर गुन्हे दाखल

Updated: बुधवार, 1 एप्रिल 2020 (19:49 IST)
 
दिल्लीतल्या निझामुद्दीन भागातल्या तबलिगी समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात देशभरातून जवळपास १८३० जण सहभागी झाले होते. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ६ जणांचा तेलंगणात मृत्यू झाला आहे.  देशातल्या अनेक भागात या कार्यक्रमात सहभागी झालेल्या व्यक्ती आढळून येतायत. त्याचं महाराष्ट्र कनेक्शनही समोर येत आहे.
 
निजामुद्दीनच्या कार्यक्रमात सहभागी झालेले १३० हून अधिक जण पुणे आणि परिसरात असल्याचं समोर आलंय. १४ जणांना पिंपरी-चिंचवड महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलेत. तर आणखी १८ जणांचा शोध सुरू करण्यात आलाय. मराठवाड्यातूनही या मरकजमध्ये मोठ्या संख्येनं लोक गेल्याचं पुढं आलंय. औरंगाबादमधून ४७ जण मरकजमध्ये सहभागी झाले होते. कोल्हापूर जिल्ह्यातले २१ जणही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. अमरावतीतील पाच जणांचा शोध घेऊन त्यांना जिल्हा रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर सोलापूरच्या बार्शी तालुक्यातील सात जण उपस्थित असल्याचंही स्पष्ट झाले आहे.
 
यवतमाळ जिल्ह्यातले १२ जण मरकज कार्यक्रमात सहभागी झाले होते. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्याला असलेले ५ जण परत आले आहेत. त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलंय. उर्वरीत ७ जण अजूनही जिल्ह्यात परत आलेले नाहीत. 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

पुढील लेख
Show comments