गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

फ्री बर्गर पडलं महाग, पोट फुटले

एखादी खाण्याची वस्तू फ्री जरी मिळत असली तरी पोट आपले आहे हे विसरून चालत नाही. अशात अनेकदा फ्री ची वस्तू अधिकच महागात पडते. याचं एक उदाहरण नवी दिल्ली येथे पहायला मिळाले जिथे स्पर्धा ठेवण्यात आली होती की जो सर्वात जास्त मिरची बर्गर खाईल त्याला महिनाभर रेस्टॉरंटमध्ये फ्री जेवण मिळेल. या स्पर्धेत दिल्ली विद्यापिठातील सेकंड इअरच्या विद्यार्थी गर्व गुप्ता याने बाजी मारली. परंतू अती बर्गर खाल्ल्यामुळे आतून त्याचं पोट फाटल्याची घटना घडली आहे. यामुळे त्याला शस्त्रक्रियाला सामोरा जावं लागलं.
 
गर्व गुप्ता याने आपल्या मित्रांसोबत या स्पर्धेत भाग घेतला होता. त्याने स्पर्धा जिंकली परंतू दुसर्‍या दिवशी त्याला रक्ताची उलटी झाली. डॉक्टरांकडे गेल्यावर त्याच्या पोटातील आतील भाग फुटला आहे असे सांगण्यात आले. गर्वच्या पोटातील आतील लाइनिंग फुटली जी सर्जरी करून बाहेर काढली व इतर दुरुस्त करण्यात आली.
 
बीएलके सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे डॉक्टर दीप गोयल यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोटातील जी लाइनिंग फुटली होती ती उपचाराने ठीक होणार नव्हती म्हणून काढावी लागली. इनर लाइनिंग ही पोटाला प्रोटक्ट करण्याचे काम करत असते. मिरची ही एसिटिक असते आणि त्यामुळे पोटात अॅसिडिटी बनते. खूप चिली बर्गर खाल्ल्याने हा सर्व प्रकार घडल्याचे डॉक्टराने सांगितले.