1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. chindwara fire

रेशनिंग दुकानात रॉकेलला आग, 15 जणांचा होरपळून मृत्यू

मध्यप्रदेशमधील छिंदवाडा येथे रेशनिंग दुकानात रॉकेलला आग लागल्यानं 15 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे.  छिंदवाडामधील बारगी गावातील रेशनिंग दुकानात रॉकेल वाटप सुरु होतं. यावेळी दुकानाबाहेर मोठ्या प्रमाणाता रांगा लागल्या होत्या. ज्या खोलीत रॉकेलचा साठा करण्यात आला होता तिथे देखील 50 ते 60 जण दाटीवाटीनं उभे होते. याचवेळी तिथं अचानक आग भडकली. अचानक आग लागल्यानं एकच गोंधळ उडाला होता. या संपूर्ण गदारोळात अनेक जण आतच अडकले. त्यामुळे काही जण गंभीर जखमी झाले आहे.  मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तर आगी मागच कारण समजू शकलेले नाही.

पुढील लेख
गो जिओ फॉर DTH