गुरूवार, 1 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Updated :वडोदरा , शुक्रवार, 23 डिसेंबर 2016 (12:58 IST)

VIP दारू पार्टीत रेड, IPLचे माजी कमिशनर चिरायू अमीन देखील सामील

police raided
गुजरातमध्ये बेकायदेशीर पद्धतीने दारू पार्टी करण्याचा आरोपात पोलिसांनी गुरुवारी रात्री 200 पेक्षा जास्त लोकांना पकडले. पकडण्यात आलेल्या लोकांमध्ये मोठे व्यापारी, महिला आणि हाय प्रोफाइल लोक सामील होते. मीडिया रिपोर्टनुसार यात इंडियन प्रीमियर लीग (IPL)चे माजी कमिशनर चिरायू अमीन देखील होते.  
 
पोलिसांनी या लोकांना वडोदराजवळ एका फॉर्महाउसमध्ये पकडले. हे लोक एका लग्नाच्या कार्यक्रमात सामील झाले होते जेथे दारू सर्व्ह करण्यात येत होती. सांगायचे म्हणजे गुजरातमध्ये दारूवर प्रतिबंध लागलेला आहे. पोलिसांनी या लोकांना अटक करून त्यांना ठाण्यात घेऊन गेले जेथे त्यांना जामीनवीवर सोडण्यात आले आहे.  
 
चिरायू अमीन गुजरातचे प्रमुख उद्योगपती आहे. ते फार्मास्‍युटिकल ग्रुप अलेंबिक लिमिटेडचे चेयरमॅन देखील आहे. त्यांच्या कंपनीचे टर्नओवर 1200 कोटी रुपये एवढे आहे. आयपीएलचे कमिशनरशिवाय ते भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) चे वाईस-प्रेसिडेंट देखील होते.