Biodata Maker marathi
✕

इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनीचा शाळेत हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

Updated: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (15:11 IST)
 
शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनी वर्गात शिकत असताना अचानक बेंचवर पडली. तिला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 
 
गुजरातमधील राजकोटमध्ये आठवीतील एका विद्यार्थिनीचा शाळेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी शाळा व्यवस्थापनाला जबाबदार धरले आहे. सध्या राज्य सरकारच्या वतीने शाळा प्रशासनाकडून अहवाल मागवण्यात आला आहे 
 
मिळालेल्या माहितीनुसार, राजकोटच्या जसानी स्कूलमध्ये इयत्ता 8 वी मध्ये  शिकणारी रिया अभ्यास करताना अचानक बेंचवर पडली. विद्यार्थिनीला तत्काळ रुग्णालयात नेण्यात.आले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. थंडीमुळे विद्यार्थिनीला हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तात्काळ उपचार न मिळाल्याने त्यांच्या मुलीचा मृत्यू झाला. 
 
रिया सकाळी 7 वाजता शाळेत पोहोचल्याचे सांगितले जात आहे. यानंतर ती 7.30 वाजता प्रार्थना करून 8 वाजता वर्गात पोहोचली.  यादरम्यान तिला थंडी वाजून अचानक बेशुद्ध पडली. हृदयविकाराच्या झटक्याने विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्यानंतर शिक्षण विभागही कारवाईत आला आहे 
 
डॉक्टर म्हणतात की थंडीमुळे रक्त गोठते. अशा स्थितीत विद्यार्थ्याने परिधान केलेल्या स्वेटरपेक्षा शरीर उबदार राहण्याची शक्यता कमी होती. अशा स्थितीत रक्त गोठल्यामुळे रक्तप्रवाह कमी झाला असावा. 
 
Edited By - Priya Dixit   
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments