1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 20 जानेवारी 2023 (14:03 IST)

जुळ्या मुलींच्या जन्मानंतर वडिलांची आत्महत्या

in Balaghat district of Madhya Pradesh
मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जुळ्या मुली झाल्यामुळे दोन मुलींच्या पित्याने आत्महत्या केली. रुग्णालयात मुलींची माहिती मिळताच तो औषधे आणायला जायचे असे सांगून निघून गेला आणि परत आलाच नाही. त्याचा मृतदेह नदीत सापडला. वासुदेव पटले असे या मयत व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे 
 
बालाघाट जिल्ह्यातील धुनी गावात राहणारा वासुदेव पटले (वय 35) हा शेतकरी शेतीबरोबरच खाजगी काम करायचा. तरुणाला दोन मुली असून त्याची पत्नी मीना हिने बुधवारी बालाघाट जिल्हा रुग्णालयात पुन्हा जुळ्या मुलींना जन्म दिला. जुळ्या मुलींच्या जन्मामुळे तरुण संतापला होता. हा तरुण आपल्या एका नातेवाईकाला औषधे आणण्यास सांगून रुग्णालयातून निघून गेला होता.
 
सायंकाळी 6 वाजेपर्यंत हा तरुण परतला नाही, त्यामुळे कुटुंबीय आणि नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. जुळ्या मुलींचा जन्म झाल्याने नातेवाईक गुरुवारी सकाळी पोलिस ठाण्यात आले आणि त्यांनी वासुदेव बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. तपासादरम्यान सदर वर्णनातील व्यक्तीने बैनगंगा नदीत उडी मारल्याचे निष्पन्न झाले. त्याचा ठावठिकाणा समजू शकला नाही. होमगार्ड डायव्हरच्या मदतीने नदीत तरुणाचा शोध घेण्यात आला.आणि तरुणाचा मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. पोलिसांनी प्रकरणाची दखल घेतली आहे. 
 
Edited By - Priya Dixit