15 लाख कर्मचाऱ्यांना नियमित करणार, काँग्रेसने दिले आश्वासन
गुजरातमधील विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसतसे सर्वच राजकीय पक्ष एक-एक आश्वासने देत आहेत. अशात काँग्रेसने जाहीर केले आहे की गुजरातमध्ये पक्ष सत्तेवर आल्यास विविध सरकारी संस्था आणि विभागांमध्ये कंत्राटी किंवा आउटसोर्स कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या सुमारे 15 लाख तरुणांना सरकारी नोकऱ्या दिल्या जातील.
गुजरातच्या विरोधी पक्षाच्या राज्य युनिटचे कार्यकारी अध्यक्ष आणि आमदार हिम्मत सिंग पटेल यांनी ही घोषणा केली. ज्यांना बेकायदेशीर मालमत्ता नियमित करायच्या आहेत त्यांना ते विनामूल्य करण्याची परवानगी दिली जाईल, असे आश्वासनही काँग्रेसने दिले आहे.
पटेल यांनी सांगितले की गुजरातमध्ये आमचा पक्ष सत्तेवर आल्यास सुमारे पाच लाख कंत्राटी आणि 10 लाख आऊटसोर्स कर्मचाऱ्यांना नियमित करणार आहे. सत्ताधारी भाजपकडून या तरुणांचे शोषण केले जात असल्याचेही ते म्हणाले.