सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 28 जानेवारी 2019 (09:17 IST)

काँग्रेसची निवडणुकीची तयारी

सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांची मुंबईत बैठक घेण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी जिल्ह्यातील काँग्रेसच्या नेत्यांचीही मते जाणून घेतली. येत्या 30 जानेवारीला होणार्‍या पार्लमेंटरी बोर्डकडे इच्छुकांपैकी दोघांची नावे पाठवण्यात येणार आहे. 
 
यावेळी सर्वांनाच लोकसभेच्या उमेदवारीबाबत विचारणा करण्यात आली. यावेळी आमदार विश्‍वजित कदम आणि मोहनराव कदम यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक नसल्याचे चव्हाण यांना सांगितले. शिवाय विशाल पाटील आणि जयश्री पाटील यांनीही लोकसभेसाठी इच्छुक नसल्याचे सांगितले. यावेळी प्रतीक पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी मात्र निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले.