लग्नाचं फोटोशूट जीवावर बेतलं
केरळमधील जानकीक्कड भागात लग्नाच्या फोटोशूटदरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. 28 वर्षीय राजीन एलएलचे 14 मार्च रोजी लग्न झाले होते आणि तो आपल्या पत्नीसोबत लग्नाचे फोटोशूट करण्यासाठी कुट्टीडी नदीच्या काठावर आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, फोटो काढत असताना राजीन आणि त्याची पत्नी कनिहा घसरून नदीत पडले.
तेथे उपस्थित काही लोकांनी वेळीच राजीनच्या पत्नीला वाचवले. मात्र राजीनचा जीव वाचू शकला नाही. सध्या राजीनच्या पत्नीला मलबार मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. जिथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
हे कपल जिथे फोटोशूट करत होते तिथे कुट्टीडी नदीत पाण्याचा प्रवाह खूप वेगात होता. आणि आजूबाजूला सुरक्षा साधने किंवा रेलिंग नाही.
सेल्फी घेताना दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाला एका पोलिस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय ताहा शेख, तिचा पती २२ वर्षीय सिद्दीकी पठाण शेख आणि या जोडप्याचा मित्र शहाब अशी मृतांची नावे आहेत. शनिवारी तिघांचे मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले. नदीत बुडत असताना एकमेकांना वाचवताना तिघांचाही मृत्यू झाल्याची माहिती वडवणी पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक (एपीआय) आनंद कांगुरे यांनी दिली. या अपघाताप्रकरणी तीन वेगवेगळ्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.