सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 21 फेब्रुवारी 2023 (17:26 IST)

बाईकवर जीवघेणी स्टंटबाजी

हल्ली व्हायरल होण्यासाठी लोक कोणत्याही थराला जातात. अनेकदा हे मजेशीर असतं पण काही वेळा धोकादायक ठरतं. असे व्हिडीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल होतात. त्यामुळे तरुणांना असे व्हिडीओ बनवण्यास अधिक मजा वाटते. पण हे अनेकदा धोक्याचं ठरु शकतं. अशा आणखी एका धोकादायक स्टंटचा व्हिडीओ समोर आला आहे.
 
हा व्हिडिओ मुंबई आग्रा महामार्गांवर चाळीसगाव फाटा ते सायने दरम्यानचा आहे. येथे एका तरुणाचा बाईकवर जीवघेणी स्टंट बाजी केल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. भगवान फरस उर्फ भगतसिंग असे या तरुणाचे नाव सांगितले जात आहे. भगतसिंहच्या स्टंटबाजी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
 
व्हायरल व्हिडिओमध्ये तरुण गाडीवर वेगवेगळी स्टाईल मारत स्टंट करत आहे. उभे राहून, झोपून, पाय वर करुन स्टंट करत आहे. या तरुणाने बाईकच्या दोन्ही बाजूने दुधाच्या टाक्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा चित्र असलेला भगवा ध्वज घेऊन स्टंट बाजी केली आहे. 
 
व्हायरल झालेल्या स्टंट बाजीचा या व्हिडीओला मोठ्या प्रमाणात व्यू्हज आणि लाईक्स मिळत आहे. पण स्टंटबाजी जीवास कारणीभूत ठरू शकते असे कमेंट्स देखील येत आहे.